पुण्यातले वसंत लोहकरे आणि राम कदम हे दोन शिवसैनिक मागील ५६ वर्षांपासून म्हणजेच शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यापासून मुंबईतील शिवतीर्थावर न चुकता जात आहेत. शिवतीर्थ हे ऊर्जेचे केंद्र असून हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी यंदाही हे दोघे जण मुंबईत जाण्यासाठी तयार आहेत.